मुद्रांक शुल्क, खरेदी खत & साठेखत


 मुद्रांक शुल्क

मुद्रांक शुल्क
मुंबई मुद्रांक कायदा १९५८ परिशिष्ट २५ प्रमाणे मिळकतीच्या हस्तांतरावर मुद्रांक आकारले जाते. यात साधारणपणे शहरी व ग्रामीण मिळकती आणी रहवासी व बिगर रहवासी असे वर्गीकरण करुन त्याप्रमाणे मुद्रांक आकारले जाते.
ग्रामीण:
साधरणपणे ग्रामीण मिळकतींच्या हस्तांतरासाठी सरकारी मुल्यांकनाच्या ३% + जिल्हा परिषद सेस १% असे एकुण ४% मुद्रांकशुल्क आकारले जाते.
शहरी:
शहरी मालमत्तेच्या हस्तांतरासाठी मिळकतीचे मुल्यांकन रुपये ५,००,०००/- पेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्क आकारले जाते. रहवासी गाळ्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटच्या तरतुदीखाली मुळ झालेले करारनामे असल्यास अशा निवासी सदनिकांसाठी रुपये. ७६०० + रु. ५,००,०००/- लाखाच्या वरिल मुल्यांकनावर ५% मुद्रांक शुल्क आकारले जाते.
मुद्रांक शुल्क पुढिल प्रमाणे भरता येते:
अ) गैरन्यायिक मुद्रांक (स्टॅम्प पेपर)
ब) फ्रॅंकिंग: (त्यासाठी मुद्रांक किमतीव्यतिरिक्त रु. १० ते १५ सेवाशुल्क आकारले जाते व सध्या केलेला दस्त फ्रॅंकिंग्साठी स्विकारला जात नाही. रु. ५०,०००/- च्या वरिल फ्रॅंकिंगसाठी पॅनकार्ड फोटोप्रत आवश्यक, योग्य चलनावर मुळ खरेदीदर व हस्ते दोघांच्या सह्या आवश्यक असतात.
क) चिकट मुद्रांक: हे जिल्हा कोषागारात मुळ सहि न झालेले दस्त दाखवुन व योग्य अर्जानंतर स्टेट बॅंकेत चलन भरुन दस्तावरील चिकट मुद्रांक (तिकिटाच्या स्वरुपात)प्राप्त होऊ शकतात.
ख) ई-स्टॅम्पिग: पुण्यात स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारा नोंदणी किंवा बिगर नोंदणी दस्तासाठी हि सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी योग्य नमुन्यात लिहुन घेणार/देणार यांचा तपशील, दस्तांचा प्रकार, रक्क्म, पॅन नंबर व मालमत्ता हस्तांतर असल्यास त्याचा तपशील असतो. हा मुद्रांक स्वतंत्र कंप्युटर प्रिंटवर लोगोद्वारा वरील सर्व तपशिलांसह व विना सेवाशुल्क मिळू शकतो. एकदा विकत घेतलेला मुद्रां मुंबई मुद्रांक काय्दा कलम ५२ नुसार सहा महिन्यात वाप्रणे बंधनकारक असते.


 खरेदी खत

मालमत्तेचा हस्तांतर कायदा १८८२ कलम ५४ ते ५७ नुसार खरेदी म्हणजे मालमत्तेचे मालकी हक्काचे हस्तांतर म्हनजे अदा केलेल्या पुर्ण किमतीच्या बदल्यात किंवा अंशत: अदा केलेल्या किमतीच्या बदल्यात किंवा भविष्यात मोबदला देण्याच्या कबुलीवर नोंदणीकृत केलेला व्यवहार होय. याचाच अर्थ ठरलेला मोबदला पुर्ण किंवा अंशत: खरेदीपुर्वी, खरेदीच्या वेळी किंव खरेदी नंतर दिला तरी चालु शकतो.
खरेदीखत करताना साठेखतात/करारनाम्यात ठरलेल्या सर्व अटि किंवा शर्ती पुर्ण झाल्यास किंव कसे, हे बघणे खालील गोश्ती आवश्यक आहेत.
खरेदीखत विसार पावती, करारनामा यात नमुद केलेल्या अटी व शर्तीचा उल्लेख असणे आवश्यक असते. यात लिहुन देणार व घेणार यांचा नाव, वय, व्य्वसय, पत्ता, पॅन नंबर आवश्यक आसतो. याशिवाय मालमत्तेचे तपशीलवार वर्णन, पुर्वी झालेल्या मालमत्ता हस्तांतराचा तपशील व ताबा वेगवेगळ्या मंजुरी व परवाअनग्यांचा तपशील, ओनरशिप फ्लॅट कायद्यातील तरतुदीनुसार सोसायटी किंवा अपार्टमेंट झाले असल्यास त्याचा व सभासदत्वाचा तपशील, मालमत्ता विकण्याचे कारण, मोबदला तपशील व अदा करण्याची पद्धत, वेळ, ताब्याचा तपशील, निर्वेध टायटलबद्दल हमी, कर भरल्याचा तपशील, साक्षीदर, मालमत्ता विकण्याच्या आनी घेण्याच्या हेतुने केलेल्या सह्या, वगैरे तपशील असावा लागतो. विक्री करणा-यास हि मिळकत विकण्याचा हक्क व त्याचा तपशील असावा लागतो. विक्री क्रणा-यास सदर मिळकत विकण्याचा हक्क व त्याचा तपशील, देणर-घेणार यांचे पॅन नंबर गरजेचे असतात.
खरेदीखता सोबत:
१) करारनामा अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेअबद्दल होऊ शकतो, मात्र खरेदीखत हे फक्त अस्तित्वातील मालमत्तेचेच होऊ शकते.
२) करारनामा हा फक्त दोन पक्षांना मान्य असतो. मात्र खरेदी खत हे सर्व जगाला मान्य असतो.
३) करारनामा म्हणजे मालमत्तेचे हस्तांतर नव्हे तर दोन पक्षातील खरेदी विक्री बाबतीत ठरलेल्या अटी, पण खरेदीखत म्हणजे मालमत्तेचे प्रत्यक्ष हस्तांतर होय.
४) करारनामा साधारणपणे अनोंदणीकृत असतो, मात्र खरेदीखत हे नोंदनीकृतच असावे लागते.
५) करारनाम्यातुन कोणतेच हक्क प्रदान होत नाहित, तर खरेदीखतातुन खर्वच हक्क प्रदान होतात.
त्यामुळे नुसत्या करारनाम्यावर किंवा साठेखतावर विसंबुन नराहता पुढे जाउण खरेदीखत आवश करुन घ्यावे.
सहकारी गृहसंस्था परवानगी व सभासदत्व/अपार्टमेंटचे सभासदत्व.
गाळा विकत घेण्यापुर्वी सोसायटीची परवानगी घेणे श्रेयस्कर असते. (मात्र बंधनकारक नसते) गाळा खरेदी केल्यानंतर विहित नम्य्न्यात सोसायटीच्या सभसदासाठी अर्ज करावा लागतो. सोबत खरेदीच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी. त्यासोबत संस्थेने ठरवलेले गाळा हस्तांतर शुल्क जास्तीत जास्त रुपये २५,०००/- पर्यंत रितसर भरुन तशी पावती घ्यावी. संस्थेने सभासदत्व न दिल्यास उपनिबंधकाकडे दाद मागावी. योग्य पुर्तता केल्यास कायद्याने सभासदत्व देणे बंधनकारक असते. सभासदत्व मिळाल्यावर मुळ भाग प्रमाणपत्रांच्या पाठिमागील बाजुस संस्थेचे सचिव व अध्यक्ष यांचे हस्तांतर तपशील नोंदवुन घ्यावा व असे मुळ भाग प्रमाणपत्र मुळ दस्तांसोबत ठेवावेत.
मात्र, अपार्टमेंट असल्यास अपार्टमेंट असोसिएशनचे नोंदणीकृत घोषणापत्र व उपविधी त्यातील मिळकतीचा तपशील व डिड ऑफ आपार्टमेंट नोंदविलेले असेल तरच गाळ्याचा विचार करावा. मात्र सहकारी गृहसंस्थेच्या नावे जमिनीचे अभिहस्तांतर (conveyance) झाले किंवा कसे, हेही जरुर पाहावे.


साठेखत
मलमत्तेचा हस्तांतर कयदा सांगतो, की मिळकतीचे साठेखत/करारनामा म्हणजे मिळकतीचे हस्तांतर नाही, तर मलमत्ता घेणार/विकणार यांच्यामधेय ठरलेल्या अटी व शर्तीनुसार ठरविलेल्या कालावधीत कागदपत्रांची पुर्तता कर्य व शेवटी मालमत्तेचे हस्तांतर नोंदणीकृत खरेदीखताने करु, असा तपशील असतो.
साठेखतात खरेदीखताचा बहुतेक सर्व तपशील येतो. यात मालमत्तेचे वर्णन, तिय़्चा हस्तांतराचा प्रवास, विकाचाचा तपशील व विसार पावतीत दिलेला इतर तपशीक, ठरवलेल्या अटी, शर्ती यांचा स्पष्ट लेखी उल्लेख असतो. यात ठरलेला मोबदला देण्याची पद्धत, कालावधी, कागद्पत्रंची पुर्तत, विविध प्रकारच्या परबानगीचा तपशील व खरेदीखत नोंदविण्याची अंतिम मुदत यासंबंधात ठरविलेल्या अटी व शर्तीचा उहापोह असतो. अलोकडे साठेखत किंवा करारनाम्यास पुर्ण मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल लागते. पुढे असे मुद्रांक व नोंदनी शुल्क खरेदीखतस लागत नाही. अंतिमत: साठेखत किंवा करारनाम्याचे खरेदी खतात रुपांतर करणे गरजेचे आहे. खरेदी खतानंतरच पुढे रेकॉर्ड ऑफ द राईट्ला नाव लागतो व मालमत्ता टायटल पुर्ण होते.
करारनाम्यासोबत
१) जागेचा उतारा, एन.ए. आदेश, कमाल जमीन धारणा कयदा आदेश, झोन दाखला.
२) मंजुर आराखडा.
३) बांधकाम चालु परवाना.
४) वकिलाचे ओळखपत्र, पॅनकार्ड, घोषणापत्र वगैरे कागदपत्रे जोडावी लागतात.

38 comments:

  1. very nice information on Agreement to Sale & Sale deed. Request you to throw some light on conveyance deed as well.
    also let us know if we can convert agreement to sale to Sale deed.
    are we supposed to pay registration & stamp duty again?

    ReplyDelete
  2. सर 1 varsha purvi visar pauti keli hoti tya 1 mahinyachi mudadt hoti ti mudat sanpun 1 varsh zal ahe
    Tr dusari visar pavti karun jamin vikaichi ahe tr ky aadchan ain ka sir

    ReplyDelete
  3. मला 2225000 एवढ्या किमतीचे नवे घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क,नोंदणी फी वगैरे किती खर्च येईल? Gst भरावा लागेल का ?

    ReplyDelete
  4. ग्रामपंचायत हद्दीत घर आहे.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. इसार पावति मध्ये व्यवहरची रक्कम ४८ लाख आहे आनी साठेखत मध्ये ११ लाख आहे मग ११ लाख देउन खरेदि हौ शकते का

    ReplyDelete
  7. उपयुक्त माहिती आहे, मराठी शब्दांचा योग्य इंग्रजी अनुवाद द्यावा.

    ReplyDelete
  8. I had purchase a agi. Land it's done sathekhat and power of attorney and then after six month I done kharedikhat against first owner
    1) He can't give me between period any N.O.C. and any sign
    2) for this property must another 7/12 holders sign.
    At this period FIRST OWNER COMPLAINED AGAINST ME
    WHAT'S I WILL DO NOW?

    ReplyDelete
  9. Pavane Akkevis gunte chi ragesteri hote ka

    ReplyDelete
  10. Zalele kharedi khat kase pahave.

    ReplyDelete
  11. माझे अग्रीमेंट वर दस्त नंबर पडला आहे आणि मला त्यामध्ये माझ्या ptnicheपत्नीचे नावं add करायचे आहे काय करू

    ReplyDelete
  12. Sandhya green zone madhil 1R gheun tyache power of attorney and Sathe khat kelyas bhavishya t Kahi problem hou hhjto ka please ryplr sir

    ReplyDelete
  13. अष्टापुर ता हवेली जि पुणे गावठान 434 स्वेअर फुट घराचे व्ह्लूलूशन किति खरेदी खता चा खर्च

    ReplyDelete
  14. अष्टापुर चव्हाण मोब 9921734914

    ReplyDelete
  15. मोरेचिंचोरे ता नेवासा जिल्हा अ. नगर एक एकर जमीन खरेदी करण्यासाठी साठे खत किती खर्च येईल

    ReplyDelete
  16. पावर ऑफ अटॉर्नी मालमत्ता घ्यावी का

    ReplyDelete
  17. पावर ऑफ अटॉर्नी मालमत्ता घ्यावी का

    ReplyDelete
  18. Special Pawar of attorney property 1500sq me ghar bana our 7/12 nikalta he kay

    ReplyDelete
  19. जर खरेदी खताचे चेक नवर्याचा अकाउनी व खरेदी खत बायकोचा नावावर असेल तर काय करावे व नवर्याचे भाडन कोरटा असेल तर ? फोन9673047382

    ReplyDelete
  20. घराचे साठेखत केले असेल तर त्याच्यावर लोन होत का

    ReplyDelete
  21. घराची नोंदणी झाली असेल तर होते

    ReplyDelete
  22. Sathe khatala 30 yars zale tar kes kunache bajune lagel

    ReplyDelete
  23. सर आमच्या जमिनीचे साठेखत होऊन ६० ते ६५ वर्ष झाले असून सदर साठेखत हे नोंदणीकृत नसून पुढच्या पार्टिने जमिनीचे पैसे घेतले आहे जमीन आमच्याकडे आहेच परंतू खरेदी झाले नसून साठेखत झाल्यापासून पुढच्या वारसांचे नावे लागली आहेत.आता ते म्हणतात जमीन आमची आहे कृपया मार्गदर्शन करावे किसन काजळे ९९२१४६८८०९

    ReplyDelete
  24. घर विकत घेतले आहे त्यासाठी काही रक्कम दिली आहे त्यासाठी करारपत्र

    ReplyDelete
  25. नमुना द्यावा

    ReplyDelete
  26. कोर्टात केस चालू असताना साठेखत खरेदी करू शकतो का!

    ReplyDelete
  27. Sathekhat kartana total kimtichya 5% stamp duty 1% registeration fee bharli ahe kharedi khat karnataka kutla tax bharava lagto ka? Please guide

    ReplyDelete
  28. नमस्कार सर मला नोंदणीकृत ईसार पावती केली होती परंतु covid-19 मुळे 30/4/ 2020 ह्या तारखेला व्यवहार खरेदी खत करायचे ठरले होते परंतु कार्यालय बंद असल्यामुळे ते होऊ शकले नाही आत्ता 15/7/2020 पुन्हा मुद्रांक शुल्क भरावे लागेल का ?
    कृपया मेलवर रिप्लाय कळवा ही विनंती

    ReplyDelete
  29. मला घर खरेदी करायचे बिगर येणेक एक गुंठा मध्ये पण त्या मालकाचे पाहिले लोण आहे साठे खत केले तर चालेले का

    ReplyDelete
  30. १०० चे बाँड वर नोटरी करून ५८लाख चे जुने घर साठेखात केले. ३ लाख टोकन मनी चेक नी दिले. विकानाऱ्यने ३ लाख माझे बँक खात्यात पाठविले. आत्ता विकणारा तय्यार होत नाही . काय करावे

    ReplyDelete
  31. Sathekhat karun 2029 madge kel tr upay sangu shakta??

    ReplyDelete
  32. Sathekhat kartani stamp duty bharli 2019 madge aata kharedikhat kartni punha stamp duty bharavi lagte ka upay sucha???

    ReplyDelete