प्रॉपर्टी विकताना!

रियल इस्टेटमधील गुंतवणूक ही काही इन्स्टन्ट पैसे देणारी गुंतवणूक नव्हे. कमीत कमी ३ ते ४ वर्षे त्या प्रॉपर्टी सांभाळल्यानंतर तुमचे रिर्टन्स मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे काही वर्षानंतर ती विकताना ठराविक गोष्टींची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. घर विकताना मूळ किमतीपेक्षा जास्त रक्कम मिळविण्याबरोबरच मार्केट ट्रेण्ड व इतर गोष्टी जाणून घेण्याची आवश्यकता असते. प्रॉपर्टी विकताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

प्रॉपटीर्मधील गुंतवणूक ही नेहमीच चांगली व उत्तम रिर्टन्स देणारी असली तरीही त्यामधील गुंतवणूक ही अधिक काळाकरीता असते. घर खरेदी करून ते लगेचच विकून चांगले रिर्टन्स मिळण्याची शक्यता प्रॉपटीर् माकेर्टमध्ये खूप धुसर असते. 'जोन्स लँग लॅसेल्ल इंडिया' (जे. एल. एल.) या रियल इस्टेटवर अभ्यास करणाऱ्या संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर (पश्चिम विभाग) रमेश नायर यांनी सांगितल्याप्रमाणे २००८ मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, खरेदीदार घर विकत घेऊन काही महिन्यातच किंमती वाढल्यानंतरच विकत असे. पण सध्या तशी परिस्थिती नाहीय. येणाऱ्या काळात ही परिस्थिती बदलेल की नाही हे स्पष्ट नसल्यामुळे प्रॉपटीर्कडे एक लाँग टर्म इन्व्हेस्टमंेट म्हणूनच बघणे गरजेचे आहे व त्यामुळे त्याच्यापासून मिळणाऱ्या फायदा-तोट्याचा विचार करायला हवा.

प्रत्येक इंडस्ट्रीमधील मागणी व पुरवठा या सूत्राचे चक्र रियल इस्टेटमध्येही बघायला मिळते. मागणी कमी असताना तुम्ही कमी किमतीत घेतलेले घर मागणी वाढल्यावर विकले तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते. पण असे व्यवहार करताना माकेर्टमधील चढ-उतारांकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. चांगली वेळ आणि माकेर्ट ट्रेण्ड बघूनच गुंतवणूक म्हणून घेतलेले घर विकल्यावर त्याचा चांगला फायदा होतो.

प्रॉपटीर् विकत असताना फक्त माकेर्ट ट्रेण्डच नव्हे तर इतर बाबींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. जर तुम्ही विकणाऱ्या घरावर कर्ज घेतलेले असेल, तर व्याजासह सगळी रक्कम भरल्यानंतर सूट मिळते की, नाही याचा विचार करण्याची गरज असते. त्यामुळे तुमच्यावर कर्जाचा डांेगर होत नाही. शिवाय तेवढीच रक्कम बँकेने दिलेल्या वेळेत भरायची असेल, तर घर विकल्यानंतर तुमच्या हातात पैसे राहून तुम्ही दुसरी गुंतवणूकही करू शकता.

इन शॉर्ट

योग्य वेळ बघून, माकेर्टचा अंदाज घेऊन योग्य किमतीने घर विका.

घरासाठी कर्ज घेतले असेल, तर त्याचे गणित करूनच घराची किंमत ठरवा.

कर्ज फेडायचे की घर विकून मिळालेले पैसे गुंतवायचे याचा सारासार हिशेब करा.

प्रॉपर्टी विकल्यानंतर खरेदी करणाऱ्याला भरावी लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीचाही अभ्यास करा.

ब्रोकर फी, वकिलाला द्यावी लागणारी फी या बाबींचा विचार करून प्रॉपटीर्ची किंमत ठरवा.

प्रॉपर्टी विकताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

No comments:

Post a Comment