रिटर्न्स कसा भरायचा, कसा नाही?

आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी रिटर्न्स भरण्याची शेवटी तारीख ३१ जुलै आहे. ज्या नोकरदारांचा टीडीएस कंपनी कापून घेते आणि ज्यांना कर भरावा लागणार नाही, अशा नोकरदारांनी ३१ मार्च २०१५ पर्यंत रिटर्न्स जमा केले तरी हरकत नाही. ज्यांना मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे आहेत त्यांनी ते कसे भरावेत, याची सविस्तर माहिती देत आहोत.

रिटर्न्स कसा भरायचा, कसा नाही?

आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या स्लॅबनुसार, वयोवर्षे ६० च्या आतील पुरुष व महिलांचे वार्षिक दोन लाख उत्पन्न असेल तर ते उत्पन्न करमुक्त आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ही मर्यादा अडीच लाख रुपये आहे. तर, ८० वर्षांच्या वरील ज्येष्ठांसाठी ही मर्यादा पाच लाख रुपये इतकी आहे. ३१ मार्च २०१४ रोजी ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक मानले जाईल. त्याचप्रमाणे ३१ मार्च २०१४ रोजी ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना सुपर सीनिअर सिटिझन्स मानले जाईल. कलम ६ ए नुसार गुंतवणूक व व्याजवरील सवलतीपूर्व उत्पन्न वरील मर्यादेपेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न्स भरावा लागेल. गुंतवणुकीवरील सवलतीनंतरही करप्राप्त उत्पन्न या मर्यादेच्या आत असेल तरीही रिटर्न्स भरावे लागतील. आपले उत्पन्न (ग्रॉस इन्कम) अडीच लाख रुपये असेल आणि वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल, तुम्ही कलम ८० सी नुसार, पीपीएफ आणि विमा योजनांमध्ये ६० हजार रुपये गुंतवणूक केली. तर, तुमचे करप्राप्त उत्पन्न १.९० लाख रुपये होते. हे उत्पन्न २ लाखाच्या एक्झेम्शन मर्यादेपेक्षा कमी आहे. पण, वजावटीपूर्वीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त होते. त्यामुळे रिटर्न्स भरावा लागेल.

टॉप पाच चुकांची शक्यता

चुकीचा फॉर्म निवडणे

कोणता फॉर्म भरायचा यासाठी नेमके नियम आहेत. याबाबत इथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनेकदा चुकीचा फॉर्म निवडला जातो, त्यामुळे योग्य फॉर्म निवडा आणि तोच भरा

रिकाम्या फॉर्मवर सही

जे लोक एखाद्या एजंटमार्फत रिटर्न्स भरतात ते बऱ्याचदा न भरलेल्या फॉर्मवर न बघताच सही करून देतात. न भरलेल्या फॉर्मवर सही करू नका. एजंटकडून फॉर्म भरण्यात थोडी जरी चूक झाली तरी त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागेल. त्यामुळे योग्यरितीने फॉर्म भरलेला आहे का याची शहानिसा करा. तुम्ही सही केली याचा अर्थ या फॉर्ममधील माहितीची जबाबदारी तुमचीच असते.

क्रमांक योग्य आहे का बघा

रिटर्न्स फॉर्ममधील पॅन, आयएफएस कोड, खाते क्रमांक, मालकाचा टॅन आदी माहिती भरताना चुका होऊ शकतात. या चुका टाळण्यासाठी क्रमांकांकडे लक्ष द्या. पॅन क्रमांकातील एखादा आकडा भरायचा राहून गेला तर इन्कम टॅक्स विभाग दंड आकारू शकते.

अॅकनॉलॉजमेंट भरताना चूक

जे करदाते ई फायलिंग करतात पण, डिजिटल सही करत नाहीत त्यांना आयटीआर पाच हा फॉर्म भरून तो बेंगळुरूला इन्कम टॅक्स ऑफिसला पाठवावा लागतो. हा फॉर्म रिटर्न्स भरल्यानंतर १२० दिवसांच्या आत भरावा लागतो. करदाते अनेकदा हा फॉर्म भरण्याचे विसरून जातात वा फॉर्म भरून तो कुरिअरने पाठवतात. पण, हा फॉर्म पोस्टाने वा स्पीड पोस्टानेच पाठवायचा असतो.

फॉर्म १६ न घेणे

तुम्ही आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर पूर्वीच्या आणि सध्याच्या कंपनी मालकांकडून 'फॉर्म १६' घ्या. पूर्वीच्या नोकरीत केलेली बचत, त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती नव्या कंपनी मालकांना दिली नसेल तर कर कमी कापला जाईल मात्र, नंतर व्याजासहित तो भरण्याची वेळ येईल.

अशी असेल ही वजावट

'८० सी'नुसार मिळणारी वजावट

८० सी, ८० सीसीसी आणि ८० सीसीडी अंतर्गंत करसवलत मिळते. ही मर्यादा सन २०१३-१४ साठी एक लाख रुपये आहे.

रिटर्न्स भरण्याची तयारी

रिटर्न्स भरण्यापूर्वी खाली दिलेली कागदपत्रे तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. रिटर्न्स फॉर्म बरोबर कागदपत्रे जोडायची नसली तरी फॉर्म भरताना त्याची आवश्यकता पडू शकते.

फॉर्म १६

तुम्ही नोकरदार असाल तर आत्तापर्यंत तुमच्या कंपनी मालकाने तुम्हाला फॉर्म १६ दिलेला असेल. याचा अर्थ कंपनीने तुमचा टीडीएस कापून घेतलेला आहे.

टीडीएस सर्टिफिकेट

पगाराव्यतिरिक्त तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर आणि टीडीएस कापला गेला असेल तर ती संस्था तुम्हाला टीडीएस सर्टिफिकेट देते. भाड्यातून मिळणारे उत्पन्न, शेअर्स, एफडी वगैरेमधून मिळणारे उत्पन्न.

फॉर्म २६ एएस

कापून गेलेला टीडीएस सरकारकडे जमा झाला आहे की नाही याची माहिती फॉर्म २६ एएस द्वारे मिळते. म्हणजेच हा टीडीएस इन्कम टॅक्सकडे पोहोचला आहे, यावर शिक्कामोर्तब होते. याची महिती तुम्हाला दोन पद्धतीने घेता येते. Incometaxindiaefining.gov.in वर जाऊन view form 26 AS वर क्लिक करा. इन्कम टॅक्स साइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे पाहता येईल. तुम्ही नेट बँकिंग करत असाल तर बँकेच्या वेबसाइटवर जाऊन view your tax credit वर क्लिक करून फॉर्म २६ एएस पाहता येईल. या बँकेतील तुमची एफडी, बचत खात्यावरील व्याज याचीही माहिती त्यात मिळू शकते.

बँक स्टेटमेंट

बचत खात्याचे वर्षभराचे (१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४)चे बँक स्टेटमेंट घ्या. वर्षभरात बँकेने किती व्याज दिले आहे हे समजेल. या व्याजातून मिळालेले उत्पन्न रिटर्न्समध्ये दाखवावे लागेल.

अन्य दस्तऐवज

पॅन नंबर, बँकेची सविस्तर माहिती आपल्याकडे पाहिजे. बँकेचा आयएफएससी नंबर रिटर्न्समध्ये भरावा लागतो. रिफंडचा पैसा थेट तुमच्या खात्यात जमा होतो.

रिटर्न्स खालील पद्धतीने भरा

कोणता फॉर्म भरायचा, हे पाहा

करदात्याच्या उत्पन्नाचा स्रोत पगार वा पेन्शन, एकाच घराच्या भाड्यातून, व्याजातून उत्पन्न मिळत असेल तर हा फार्म भरावा.

भरू नये

अन्य स्रोतातून होणाऱ्या उत्पन्नातून तोटा झाला असेल तर आयटीआर-२ हा फॉर्म भरावा.

करातून सूट (exempt income) मिळालेले उत्पन्न ५ हजारांपेक्षा जास्त असेल आयटीआर-१ न भरता आयटीआर-२ हा फॉर्म भरावा. गेल्या वर्षीपासून सीबीडीटीने हा नियम केला आहे. पीपीएफवरील व्याज, लाभांश, करमुक्त बॉण्डवरील व्याज आदी रक्कम exempt income मध्ये येते.

विदेशात मालमत्ता असेल तरीही आयटीआर-१ भरू नये.

वैयक्तिक वा हिंादू एकत्रित कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न पगार वा पेन्शन, एकापेक्षा जास्त घरांतून मिळणारे भाडे, भांडवली उत्पन्न (capital gain), व्याज तसेच, लॉटरी, घोड्याची स्पर्धा अशा अन्य स्रोतातून उत्पन्न मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.

भरू नये

व्यवसाय वा व्यावसायिक (profession) क्षेत्रातील कामातून उत्पन्न मिळत असेल तर हा फॉर्म भरू नये. फॉर्म-४ भरावा.

फर्ममधील सहयोगी सदस्यांचे उत्पन्न व्याज, पगार, बोनस, कमिशन, मोबदला, भांडवली उत्पन्न (capital gain), एकापेक्षा जास्त घरांतून मिळणारे भाडे मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.

करदात्याचे उत्पन्न मालकी उद्योगातून व्यावसायिक क्षेत्रांतून (डॉक्टर, वकील इत्यादी) वा कमिशन यातून मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.

ज्यांच्या बिझनेसची उलाढाल एक कोटींपेक्षा कमी असेल तर वा प्रकल्पित कर नियमांत (presumptive taxation rules) उद्योगाचा समावेश असेल तर हा फॉर्म भरावा.

भरू नये

capital gain झाला असले तर वा व्यावसायिक स्वयंरोजगार (डॉक्टर, वकील वगैरे) असेल तर वा कलम ४४ ए (१) अंतर्गत व्यावसायिक क्षेत्राची नोंद होत असेल तर हा फॉर्म भरू नये.

हा फॉर्म सर्व करदात्यांनी भरावा लागतो. हा पावती फॉर्म असून तुम्ही हाताने टॅक्स रिटर्न्स भरला असेल वा तुम्ही ई फायलिंग केले असेल पण, डिजिटल सही केली नसेल तर हा फॉर्म बेंगळूरूमधील इन्कम टॅक्स ऑफिसच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) पाठवावा लागतो. सही केलेला आयटीआर-५ फॉर्म सीपीसीला मिळाल्याखेरीज तुम्ही भरलेल्या रिटर्न्सची प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जात नाही.

फॉर्म कसा भरायचा?

इन्कम टॅक्स रिटर्न्स दोन पद्धतीने भरला जातो.

मॅन्युअली किंवा ऑनलाइन. मॅन्युअली भरण्यासाठी फॉर्म स्टेशनरी दुकानातून घ्या किंवा www.incometaxindia.gov.in या बेवसाइटवरून डाऊनलोड करा. सीए, वकील वा इन्कम टॅक्स विभागातील 'टीआरपी'ला फी देऊन हा फॉर्म भरून घेऊ शकता. दुसरी पद्धत म्हणजे स्वतः हा फॉर्म भरा. स्वतः फॉर्म कसा भरायचा हे समोरच्या पानावर सविस्तर सांगितलेले आहे. टीआरपीच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरणार असाल तर खालील पद्धतीने भरता येईल.

'टीआरपी'च्या मदतीने

http://www.trpscheme.com या वेबसाइटवर जा. Locate TRP वर क्लिक करा. तुम्हाला गुगुल मॅप दिसेल. त्याच्याखाली लिहिलेल्या सूचना पहा. Name या सदरात काहीही भरू नका. State व district हे पर्याय भरल्यामुळे आपल्या विभागातील टीआरपीचे नाव, पत्ता आणि फोन नंबर मिळेल. त्याच्याशी संपर्क साधा. वेळेवेळी इन्कम टॅक्स विभाग टीआरपी बाबत मीडियातून माहिती प्रसिद्ध करत असते. टोल फ्री नंबर १८००-१०-२३७३८ वर फोन करून टीआरपीसंबधी माहिती मिळवू शकता. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कधीही या नंबरवर फोन करता येईल.

कोणताही टीआरपी देशातील कुठल्याही व्यक्तीचा रिटर्न्स भरू शकतो. टीआरपीचे ओळखपत्र वा सर्टिफिकेट तपासता येऊ शकते.

टीआरपीला फॉर्म १६ ची फोटोकॉपी द्या, मूळ फॉर्म देऊ नका. त्याच्या मदतीने तो रिटर्न्स भरेल आणि जमा करेल. जमा केल्यानंतर तो त्याची पावतीही देईल. फॉर्म भरण्यात गडबड झाली तर त्याची जबाबदारी टीआरपीची असते.

खर्च किती येईल?

फॉर्म भरून तो जमा करण्यासाठी टीआरपी २५० रुपये फी घेतो.

कुठे जमा करायचे?

मुंबईतील पगारदार जे ऑफलाइन फॉर्म भरत असतील त्यांनी आयकर भवन, चर्चगेट येथे असेसमेंट ऑफिसरकडे रिटर्न्सचे फॉर्म जमा करावेत. असेसमेंट ऑफिसरबाबत माहिती मिळवण्यासाठी incometaxindia.gov.in वर जाऊन पॅनवर क्लिक करा. know your AO code वर क्लिक करा. पॅन मागितला जाईल. त्यानंतर एंटर दाबा. आयटीओ वॉर्डच्या संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. पण, तुम्ही वर्षभरात नोकरी बदलली असेल तर नव्या कंपनीनुसार वॉर्ड असेल. या बेवसाइटवर असलेली माहिती गेल्यावेळी भरलेल्या रिटर्न्सच्या आधारावर दिलेली असते. वेबसाइटवरून ही माहिती मिळत नसेल आणि तुम्ही नोकरीही बदलली नसेल तर गेल्या वर्षी भरलेल्या रिटर्न्सच्या पावतीवरून वॉर्ड मिळवता येईल.

ऑनलाइन फॉर्म असा भरा

ऑनलाइन फॉर्म भरणे अत्यंत सोपे आणि अचूक असते. त्यामुळे रिफंडही लवकर मिळतो. ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असते, त्यांना ऑनलाइन रिटर्न्स भरणे सक्तीचे आहे. अर्थात पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले करदातेही ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अनेक वेबसाइट आहेत पण, त्या फी आकारतात. इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर फॉर्म मोफत भरता येतो. त्यासाठी खाली दिलेले टप्पे पार पाडा.

incometaxindia.gov.in या वेबसाइटवर जा.
continue वर क्लिक करा. डाव्या बाजूला असलेल्या File Returns Online-Income Tax Return या पर्यायावर क्लिक करा.
A Y 2014-15 या मेन्यूमध्ये ITR1 वर क्लिक करा.
आयटीआर १ मधील Excel Utility वर क्लिक करा. यावर्षीसाठीचा 'सहज' फॉर्म येईल. आता डॉयलॉग बॉक्स मधील Save File पर्याय क्लिक करा. फॉर्म डेस्कटॉपवर सेव्ह करा.

आता फॉर्म ऑफलाइन भरा. फॉर्म व्हॅलिडेट करा.

फॉर्म भरल्यानंतर Generate XML file क्लिक करून फॉर्मचा एक्सएएमएल व्हर्जन तयार करा.

पहिल्यांदाच ई-रिटर्न्स भरत असाल तर इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि ई-मेल अकाऊंट आणि पासवर्ड मिळवा. त्यासाठी incometaxefiling.gov.in वर जा. Register वर क्लिक करा. पॅन मागितला जाईल. काही बेसिक माहिती देऊन रजिस्ट्रेशन करा.

त्याच्या मदतीने लॉग इन करा आणि Submit Return वर क्लिक करा.

एक्सएमएल फाइल ब्राउज करून अपलोड करा. अॅकनॉलेजमेंट फॉर्म येईल.

डिजिटल सही असेल तर ती द्या.

डिजिटल सही नसेल तर, अॅकनॉलेजमेट फॉर्मची प्रिंट त्यावर सही करा आणि १२० दिवसांच्या आत पोस्ट वा स्पिड पोस्टाने 'आयटी विभाग, सीपीसी, पो. बॉ. १, इलेक्ट्रॉनिक सिटी पोस्ट ऑफिस, बेंगळुरू- ५६०१०० या पत्त्यावर पाठवा.

त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाकडून १५ ते २० दिवसांत रिटर्न्स यशस्वीरित्या भरल्याचा अॅकनॉलेजमेंटसंबंधी ई-मेल वा एएसएमएस येईल. अनेकांना शंका येते की, पोस्टाने अॅकनॉलेजमेट फॉर्म बेंगळुरूला पोहोचलाच नाही तर? १५ ते २० दिवसांत ई-मेल वा एएसएमएस आला नाही तर अॅकनॉलेजमेट पुन्हा पाठवा. बेंगळुरू ऑफिसच्या ०८०-४३४५६७०० या फोन नंबर चौकशी करता येईल.

गेल्या वर्षी ऑनलाइन रिटर्न्स भरले असतील तर यंदाही भरा. असे करणे सोपे आहे. तुम्हाला फक्त उत्पन्नाचे आकडे भरावे लागतील. बाकी ‌डिटेल्स आपोआप येतील.

खर्च किती येईल?

इन्कम टॅक्स विभागाच्या साइटवरून भरत असाल तर खर्च येणार नाही. अन्य साइटवरून भरत असाल तर १०० ते ७५० रुपयांपर्यंतचा खर्च येईल.

काही पेड साइट

Taxsmile.com

Myitreturn.com

Taxspanner.com 

No comments:

Post a Comment